राज शांडिल्य दिग्दर्शित या चित्रपटात हे दोघेही पिता-पुत्राची भूमिका साकारणार आहेत.
विकी डोनर नंतर आयुष्मान खुराणा आणि अनु कपूर ड्रीम गर्ल मध्ये पुन्हा एकत्र
मुंबई - 22 Apr 2019 11:59 IST
Updated : 01 May 2019 2:45 IST
Our Correspondent
शूजित सरकार दिग्दर्शित विकी डोनर (२०१२) सुपरहिट झाला होता. चित्रपटात यामी गौतम आणि आयुष्मान खुराणा प्रमुख भूमिकेत असले तरी आयुष्मान खुराणा आणि अनु कपूर यांची जोडी देखील लोकांना तितकीच आवडली होती.
आता सात वर्षानंतर राज शांडिल्य दिग्दर्शित ड्रीम गर्ल मध्ये आयुष्मान आणि अनु कपूर यांची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे.
खुराणा यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ही बातमी दिली. योगायोगाची गोष्ट म्हणजे ड्रीम गर्ल च्या शूटिंग ची सुरुवात त्याच दिवशी झाली ज्या दिवशी विकी डोनर रिलीज झाला होता.
"हे खरंच स्वप्नवत आहे की विकी डोनर च्या रिलीज नंतर सात वर्षांनी आम्ही ड्रीम गर्ल साठी शूटिंग केली, अनु कपूर सर माझ्या वडिलांची भूमिका साकारत आहेत," खुराणा म्हणाले.
विकी डोनर मध्ये अनु कपूर डॉ बलदेव चड्ढा स्पर्म बँक आणि फर्टिलिटी सेंटर चालवतात. ते आयुष्मान च्या पात्राला स्पर्म डोनेशन च्या व्यवसायात आणतात. नंतर विकी यामी यांच्या पात्राच्या प्रेमात पडतो.
विकी डोनर मधून आयुष्मान ने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
नुश्रत भरूचा ड्रीम गर्ल मध्ये नायिकेची भूमिका साकारणार आहेत. अरबाज खान, मंजोत सिंह आणि सुमोना चक्रवर्ती यांच्या सुद्धा चित्रपटात भूमिका आहेत.
शांडिल्य यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. या अगोदर त्यांनी वेलकम बॅक (२०१५), फ्रिकी अली (२०१६), भूमी (२०१७) आणि भय्याजी सुपरहिट (२०१८) हे चित्रपट लिहले आहेत. परिणीती चोपड़ा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा जबरिया जोडी हा चित्रपट सुद्धा त्यांनी लिहला आहे.
ड्रीम गर्ल १३ सप्टेंबर ला रिलीज होईल.
Related topics