दे दे प्यार दे मध्ये ५० वर्षाचा आशिष (अजय देवगण) २६ वर्षाची गर्लफ्रेंड आयेशा (रकुल प्रीत) बरोबर रोमान्स करताना दिसेल. निर्माता लव रंजन ने हा चित्रपट लिहला आहे. अजय देवगणच्या ५०व्या वाढदिवशी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.
आशिष आणि त्याची पत्नी मंजू यांचा घटस्फोट झाला आहे. पण आशिष खूप वर्षानंतर आयेशाबरोबर आपल्या कुटूंबाला भेटायला जातो तेव्हा काही प्राब्लेम्स निर्माण होतात.
आशिष आणि मंजू च्या मुलांना मात्र आशिष आणि आयेशा चे हे नवीन नाते बिल्कुल मान्य नाही. आयेशा आणि मंजू या दोघांमधला संघर्ष चित्रपटाचा मूळ धागा आहे. जिम्मी शेरगील च्या पात्राला मंजू बद्दल आकर्षण आहे.
संकलक एकीव अली या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. प्रकाश मेहरा दिग्दर्शित शराबी चित्रपटात किशोर कुमार ने गायलेले 'दे दे प्यार दे' या गाण्यावरून चित्रपटाचे शीर्षक घेतलेले आहे. सुरभी भटनागर, लव रंजन आणि तरुण जैन यांनी मिळून हा चित्रपट लिहला आहे.
टिपिकल लव रंजन चा स्टॅम्प असलेल्या या चित्रपटात विनोदाच्या नावाखाली काही आक्षेपार्ह संवाद आहेत.
तब्बू ने या अगोदर चिनी कम (२००७) मध्ये काम केले आहे. चिनी कम मध्ये तब्बू एका वयस्कर व्यक्तीच्या प्रेमात पडतात. अमिताभ बच्चन यांनी त्या वयस्कर व्यक्तीची भूमिका केली होती आणि चित्रपटाचे कथानक विचारपूर्वक हाताळले होते. दे दे प्यार दे च्या ट्रेलरवरून तरी असे वाटत नाही.
दे दे प्यार दे १७ मे ला रिलीज होईल. ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला कळवा.