कुलकर्णी चित्रपटामध्ये नृत्यदिग्दर्शकाच्या भूमिकेत आहेत.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी मोगरा फुलला मध्ये स्वप्नील जोशींच्या काकाची भूमिका साकारत आहेत
मुंबई - 16 Apr 2019 18:00 IST
Updated : 11 May 2019 22:16 IST
Keyur Seta
मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी स्वप्नील जोशी यांच्या मोगरा फुलला मध्ये महत्वाची भूमिका साकारत आहेत.
निर्मात्यांनी सांगितले की कुलकर्णी स्वप्नील जोशींच्या काकाची भूमिका साकारत आहेत. दोघेही खूप चांगले मित्र आहेत. कुलकर्णी चित्रपटामध्ये नृत्यदिग्दर्शक आहेत.
कुलकर्णी म्हणाले की "मी दिग्दर्शक म्हणूच सगळीकडे परिचित आहे. पण जेव्हा एखादा दिग्दर्शक अथवा लेखकाला पूर्ण खात्री असते की मीच ही भूमिका साकारु शकतो, तेव्हाच मी त्या चित्रपटात अभिनय करतो. मोगरा फुलला च्या बाबतीत सुद्धा असेच घडले. चित्रपटाचे लेखक सचिन मोटे यांना पूर्ण खात्री होती मी ही भूमिका साकारू शकतो."
या अगोदर त्यांनी बनगरवाडी (१९९५) आणि पिपाणी (२०१२) या चित्रपटात अभिनय केला आहे. बिनधास्त (१९९९) या उत्कृष्ट चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी तुकाराम (२०१२) या सुपरहिट मराठी चित्रपटाचे सुद्धा दिग्दर्शन केले आहे.
निर्मात्यांनी रिलीज केलेल्या पोस्टरमध्ये आपल्याला स्वप्नील जोशी आणि चंद्रकांत कुलकर्णी एकाच स्कूटरवर बसलेले दिसत आहेत. दोघां मध्ये ही घनिष्ट मैत्री आहे असे वाटते. नीना कुलकर्णी चित्रपटात स्वप्नील जोशींच्या आईची भूमिका साकारत आहेत.
घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे उशिरा प्रेमात पडलेल्या पुरुषाची गोष्ट आपल्याला मोगरा फुलला मध्ये पाहायला मिळेल. सई देवधर, संदीप पाठक आणि आनंद इंगळे हे कलाकार सुद्धा चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसतील.
श्राबनी देवधर दिग्दर्शित मोगरा फुलला १४ जून ला रिलीज होईल.
Related topics
Poster review