भारताचा ओसामा ला पकडण्याची गोष्ट असे लिहल्यावर त्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होणे साहजिकच आहे. राज कुमार गुप्ता लिखित-दिग्दर्शित या चित्रपटात हा भारताचा ओसामा नक्की कोण आहे?
चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. या खतरनाक आतंकवाद्याला पकडण्यासाठी चाललेला खटाटोप हीच या चित्रपटाची कथा आहे.
या आतंकवाद्याने २००७ ते २०१३ या काळात एकूण ५२ स्फोट घडवून आणले आणि ४३३ लोकांना ठार मारले. २००८ साली मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सुद्धा त्याचा हात होता.
गुप्ता यांच्या चित्रपटातला हा आतंकवादी भगवतगीतेमधले श्लोक बोलतो यावरून त्याच्याविषयी अजून उत्सुकता निर्माण होते. भारताच्या इंटेलिजन्स एजन्सीला त्याचे नाव सुद्धा माहिती नाही.
खऱ्या घटनेवर आधारित या चित्रपटात आपल्याला ५ सामान्य माणसं दिसतात. कपूर त्यांचे म्होरक्या आहेत. हे पाचजण कोणत्याही हत्याराशिवाय या आतंकवाद्याला पकडण्यासाठी निघाले आहेत. या कामामध्ये ते कसे यशस्वी होतील ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
कपूर आणि त्यांचे चार साथीदार अगदी सामान्य व्यक्ती आहेत. या अगोदर सुद्धा सामान्य लोकांनी असामान्य कामे केली आहेत. या टीजरमुळे गुप्ता यांच्या या कथेबद्दल अजून कुतूहल निर्माण झाले आहे.
२४ मे ला हा चित्रपट प्रदर्शित होईल. खाली टीजर पहा आणि तुम्ही हा चित्रपट पाहणार का नाही ते आम्हाला कळवा.