{ Page-Title / Story-Title }

News Hindi

भारत पोस्टर – सलमान खान यांचा भारत आता तरुण अवतारात

Read in: English


सलमान खान ने परिधान केलेल्या सफेद शर्टावर आपल्याला मौत का कुआ मध्ये चालणाऱ्या कार आणि बाइक दिसतात. भारतमध्ये खान सर्कस मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहेत का?

Keyur Seta

भारत च्या पहिल्या पोस्टरमध्ये आपल्याला सलमान खान वयोवृद्ध रूपात दिसले होते. निर्मात्यांनी रिलीज केलेल्या दुसऱ्या पोस्टरमध्ये खान एकदम तरुण रूपात दिसत आहेत.

चित्रपटातला १९६४ मध्ये घडणारा भाग या पोस्टरवर अधोरेखित केलेला आहे. सलमान खान पोस्टरवर सुदंर दिसत आहेत. एका बाजूला केसांचा भांग पडलेले सलमान खान खूपच तरुण दिसत आहेत. मेकअप आर्टिस्ट ने या लुक साठी खूप मेहनत घेतले असे दिसते.

या पोस्टरवर दिशा पटनी ट्रपीझ आर्टिस्ट म्हणून दिसतात. खान ने परिधान केलेल्या सफेद शर्टावर आपल्याला मौत का कुआ मध्ये चालणाऱ्या कार आणि बाइक दिसतात. भारत मध्ये खान सर्कस मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारत आहेत का?

भारत ही नायकाच्या नजरेतून सांगितलेली इंडियाची गोष्ट आहे. नायकाचे नाव सुद्धा भारत आहे. काही महिन्यांपूर्वी रिलीज केलेल्या टायटल टीजर मध्ये खान यांचे पात्र सांगते की तो स्वतःला इंडियन समजतो म्हणून तो आडनाव लावत नाही.

अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत कोरियन चित्रपट ओड टू माय फादर (२०१४) चा अधिकृत रीमेक आहे. सुलतान (२०१६) आणि टायगर जिंदा है (२०१७) नंतर जफर यांचा सलमान खान सोबत हा तिसरा चित्रपट आहे.

Related topics

Poster review