{ Page-Title / Story-Title }

News Hindi

५ जून ला रिलीज होणाऱ्या भारत मध्ये सलमान खान दिसणार वयोवृद्ध व्यक्तीच्या भूमिकेत

Read in: English


पोस्टरवर २०१० लिहलेले दिसते, यावरून सलमान यांचा हा लुक त्या काळात असणार आहे असे वाटते.

Shriram Iyengar

मोठ्या पडद्यावर तरी सलमान खान वयोवृद्ध लुक मध्ये दिसणार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत मध्ये पहिल्यांदाच सलमान खान सफेद केस आणि दाढी मध्ये दिसणार आहेत.

दिशा पटनी, कतरीना कैफ, सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ आणि तब्बू यांच्यासुध्दा चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. ५ जून ला चित्रपट रिलीज होईल.

पोस्टरवर २०१० लिहलेले दिसते, यावरून सलमान यांचा हा लुक त्या काळात असणार आहे असे वाटते. ऍन ओड टू माय फादर (२०१४) या कोरियन चित्रपटाचा हा अधिकृत रीमेक आहे. भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजचा काळ असा खान यांच्या पात्राचा प्रवास या चित्रपटात पाहायला मिळेल.

पोस्टरवर खान यांच्या पात्राचे लहानपण सुद्धा दिसते. एका लहान मुलाला श्रॉफ मदत करत आहेत आणि त्यांच्या मागे गर्दीने भरलेली ट्रेन दिसत आहे. यावरून भारत-पाक फाळणी सुद्धा चित्रपटात दाखवणार आहेत असे वाटते.

खान यांना वृद्ध दाखवण्यासाठी सफेद दाढी आणि केसांशिवाय इतर कोणतेच प्रोस्थेटिक वापरण्याचे टाळले आहे. ईद ला म्हणजेच ५ जून ला हा चित्रपट रिलीज होईल.

Related topics

Poster review