News Hindi

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या निर्मात्यांची सुप्रीम कोर्टात धाव, सोमवारी होणार सुनावणी

निवडणूक आयोगाने आता चालू लोकसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी असे म्हणत चित्रपट प्रदर्शनावर रोक लावली आहे.

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटावर अजूनदेखील वाद चालूच आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णया विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून सोमवारी या याचिकेवर सुनावणी होईल.

निवडणूक आयोगाने आता चालू लोकसभा निवडणुकीत सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी असे म्हणत चित्रपट प्रदर्शनावर रोक लावली आहे. विवेक ओबेरॉय ने चित्रपटात नरेंद्र मोदींची भूमिका साकारली आहे. ११ एप्रिल ला हा चित्रपट रिलीज होणार होता.

परंतु आता पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या निर्मात्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णया विरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ए एन आय च्या रिपोर्टनुसार १५ एप्रिल ला याचिकेवर सुनावणी होईल.

या अगोदर चित्रपटाच्या रिलीजवर रोक लावण्यासाठी करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती. सी बी एफ सी सर्टिफिकेट न मिळालेला चित्रपट बॅन करणे अयोग्य आहे असे कोर्टाचे म्हणणे होते. चित्रपटामुळे आचारसंहितेचा भंग होतो की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे, असे ही सुप्रीम कोर्टाने त्यावेळी म्हटले होते.

१० एप्रिल ला चित्रपटाला यु सर्टिफिकेट मिळाले आणि लगेच निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या रिलीजवर रोक लावली. सध्या १९ मे ला निवडणूक संपेपर्यंत हा चित्रपट रिलीज होऊ शकत नाही.

आय ए एन एस च्या रिपोर्टनुसार निर्मात्यांनी या निर्णयामुळे आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे या आरोपाखाली सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

सुरेश ओबेरॉय, संदीप सिंह, आनंद पंडित, मनीष आचार्य या सर्वांनी मिळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात प्रशांत नारायण, बमन इराणी सारखे कलाकार आहेत.