संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातली एक महत्वाची गोष्ट. अजूनपर्यंत या विषयावर एकही चित्रपट बनला नाही ही खरंतर आश्चर्याची बाब आहे. पण आता दिग्दर्शक जयप्रद देसाई यांच्या हुतात्मा वेब-सिरीज मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या सदस्यांचा वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी चा संघर्ष दाखवला आहे.
अंजली पाटील, सचिन खेडेकर, वैभव तत्ववादी आणि छाया कदम यांच्यासारखे काही उत्कृष्ट कलाकार या सिरीजमध्ये काम करत आहेत.
टीजर पाहता असे वाटते की सुरुवातीला अंजली पाटील यांचा या चळवळीशी काही संबंध नसतो परंतु नंतर काही कारणास्तव त्यांचे पात्र या चळवळीचा भाग होते.
जयप्रद देसाई यांनी या अगोदर नागरिक (२०१५) हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. नागरिक मध्ये सचिन खेडेकर यांनी एका प्रामाणिक पत्रकाराची भूमिका केली होती.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात मराठी लोकांचे वेगळे राज्य निर्माण करावे आणि त्याची राजधानी मुंबई असावी या हेतूसाठी झाली होती. त्याच वेळी महागुजरात ही चळवळ सुरु झाली होती आणि त्यांना सुद्धा गुजराती लोकांचे वेगळे राज्य हवे होते.
१ मे १९६० ला महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली. दोन्ही राज्यांत १ मे हा महाराष्ट्र दिवस आणि गुजरात दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे २०१९ पासून झी५ वर हुतात्मा ऑनलाइन दाखवण्यात येत आहे.