News Hindi

दे दे प्यार दे गाणे: रकुल प्रीत आहेत 'वड्डी शराबन'

गीतकार कुमार ने गाण्यात पंजाबी शब्दांचा जास्त वापर केला आहे.

दे दे प्यार दे हे शीर्षक अमिताभ बच्चन यांच्या शराबी (१९८४) चित्रपटातल्या 'दे दे प्यार दे' या गाण्यापासून प्रेरित आहे. दोन्ही चित्रपटांच्या कथेमध्ये जमीन अस्मानाचा फरक असला तरी या चित्रपटात एका स्त्रीचे दारूबद्दल असलेल्या प्रेमावर एक गाणे आहे.

निर्माते लव रंजन यांच्या सोनू के टिटू की स्वीटी (२०१८) या चित्रपटात नुश्रत भरुचाने 'छोटे छोटे पेग' या गाण्यावर ताल धरला होता आणि आता दे दे प्यार दे चित्रपटात रकुल प्रीत 'वड्डी शराबन' या गाण्यावर बेधुंद नाचत आहेत.

पंजाबी लोक त्यांच्या दारूविषयी असलेल्या प्रेमाबद्दल जगविख्यात आहेत, परंतु आतापर्यंत नेहमी पुरुषांचे दारूबद्दल चे प्रेम चित्रपटातून दाखवण्यात आले होते. पण या गाण्यात आयेशा आपले दारूबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. हा देखील स्त्री स्वातंत्र्याचा एक प्रकारच म्हणावा लागेल.

गीतकार कुमार ने गाण्यात पंजाबी शब्दांचा जास्त वापर केला आहे. आयेशा आणि इतर स्त्रिया दारुच्या नशेत बेधुंद होऊन नाचत आहेत. कुमार चे शब्दसुद्धा गाण्याच्या विषयाबरोबर जातात. शब्द पंजाबी मध्ये असले तरी गाण्यात युपी आणि बिहार चा उल्लेख आहे.

सुनिधी चौहान हिंदी चित्रपटसृष्टीची पॉप क्वीन म्हणून ओळखल्या जातात, त्यामुळे साहजिकच त्यांनी हे गाणेसुद्धा उत्तमच गायले आहे, परंतु गाण्यात खरी मजा आणले नवराज हंसल च्या आवाजाने.

संगीत दिग्दर्शक विपीन शर्मा ने गाण्यात पंजाबी बीट्स वापरले आहेत. सोनू के टिटू की स्वीटी (२०१८) मधील 'छोटे छोटे पेग' आणि कॉकटेल (२०१२) मधील 'अंग्रेजी वीड' या गाण्यांशी तुलना केली तर हे गाणे थोडे फिके पडते.

गाण्याचे नृत्य दिग्दर्शन मात्र आपली निराशा करते. गाण्यातल्या नागीण डान्स सोडला तर पाहण्यासारखे काही नाही. अजय देवगण पूर्ण गाण्यात फक्त डान्स करणाऱ्या स्त्रियांना न्याहाळत असतात.

दे दे प्यार दे १७ मे ला रीलीज होईल. खाली गाणे पहा आणि तुम्ही चित्रपट पाहणार का ते आम्हाला कळवा.