मारवल च्या चित्रपटांना भारतात खूप लोकप्रियता मिळाली आहे. एवेन्जर्स एंडगेम (२०१९) ची प्रमोशन स्ट्रॅटेजी म्हणून मारवल स्टुडिओ ने खास भारतीय प्रेक्षकांसाठी जगप्रसिद्ध गायक-संगीतकार ए आर रहमान बरोबर 'मारवल अँथम' तयार केले आहे.
हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत हे गाणे बनवले आहे कारण चित्रपटसुद्धा या तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
हिंदी व्हर्जन सर्वात अगोदर रिलीज करण्यात आले आहे, पण या गाण्याने निराशा केली. रहमान यांचे हे अत्यंत साधारण गाणे आहे.
सर्वात जास्त निराशा गीतकार निर्मिका सिंह ने केली आहे. 'रोके ना रुकेंगे अब तो यारा' सारखी अत्यंत बालिश शब्दरचना एवढ्या मोठ्या चित्रपटाला शोभत नाही. हे गाणे फक्त भारतीय प्रेक्षकांसाठी बनवले असले तरी रहमान कडून यापेक्षा खूप उच्च दर्जाचे गाणे बनवण्याच्या अपेक्षा होत्या.
फक्त शब्दच नव्हे तर रहमान यांच्या गायकी ने सुद्धा निराशा केली आहे. सुरुवातीच्या काही ओळी ठीक आहेत पण त्यानंतर रहमान एम सी हिप ने लिहलेले रॅप गायला सुरुवात करतात त्यावेळी त्यांचे काही शब्दांचे उच्चार सुद्धा स्पष्ट ऐकू येत नाहीत. गाण्याचे पार्श्वसंगीत खूपच लाऊड आहे आणि त्यात रहमानचा लाऊड टोन यामुळे ते काय गात आहेत हेच समजत नाही. संगीतसुद्धा साधारणच आहे आणि त्यावर रहमान यांची छाप नाही.
असल्या प्रमोशनल गाण्यांमध्ये संगीतकाराने ट्रेलरमधले काही निवडक दृश्य आणि आवाज गाण्यामध्ये वापरणे आवश्यक असते. हल्क आणि वाकांडा आर्मी चा आवाज गाण्याच्या शब्द आणि म्युसिकशी सुसंगत आहेत.
पण भारतात या फ्रँचाइज चे यश लक्षात घेता चाहत्यांना यापेक्षा कित्येक पटीने चांगल्या मारवल अँथम ची अपेक्षा होती. हिंदी व्हर्जन खाली पहा.