बाबो असे शीर्षक असलेला मराठी चित्रपट ३१ मे ला रिलीज होणार आहे. चित्रपटात भारत गणेशपुरे, सयाजी शिंदे, जयवंत वाडकर, किशोर कदम, प्रतीक्षा मुणगेकर या सारख्या कलाकारांचा भरणा आहे.
रमेश साहेबराव चौधरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून दिग्दर्शक म्हणून हा त्यांच्या पहिलाच चित्रपट आहे. निर्मात्यांनी सर्व कलाकारांचे व्यंगात्मक पोस्टर्स रिलीज केले आहेत. गावातल्या अतरंगी पात्रां भोवती फिरणारा हा विनोदी चित्रपट असेल असं पोस्टर्स पाहून वाटते.
जुन्या टीव्ही सेट सारख्या दिसणाऱ्या पोस्टर्सवर ब्रेकिंग न्यूज असे लिहले आहे. कोणत्या तरी कारणामुळे हे गाव चर्चेत आले आहे असे या पोस्टर्सवरून वाटते. या सारख्या वेगळ्या विषयांवरचे चित्रपट यशस्वी होऊ शकतात हे आमिर खान निर्मित पिपली लाइव्ह (२०१०) ने दाखवून दिले आहे.
बाबो ची निर्मिती सचिन बाबुराव पवार आणि तृप्ती सचिन पवार यांनी केली आहे.