अश्या पद्धतीचे अनेक सिनेमे आपण पहिले असले तरी ह्या चित्रपटाचा विषय खूपच वेगळा आहे.
चीट इंडिया चित्रपटाचा ट्रेलर: इम्रान हाश्मी शिक्षणव्यवस्थेमधील रॉबिनहूड च्या भूमिकेत
Mumbai - 12 Dec 2018 12:32 IST
Updated : 15 Jan 2019 20:12 IST
Keyur Seta
इम्रान हाश्मी ने या अगोदर राजा नटवरलाल (२०१४) ह्या चित्रपटामध्ये फसवेगिरी हाच धंदा असणारे पात्रं साकारले होते. आणि चीट इंडिया ह्या चित्रपटातसुद्धा ते हेच पात्र साकारत आहेत. तरीही दोन्ही पात्रांमध्ये खूप फरक दिसत आहे. चीट इंडियाचा ट्रेलर सुद्धा जास्त प्रभावी आहे.
सौमिक सेन ने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात इम्रान हाश्मी अभ्यासात जास्त हुशार नसलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी निवडक हुशार विद्यार्थ्यांना इंजिनीरिंग आणि मॅनॅजमेण्टच्या प्रवेश परीक्षा द्यायला पाठवतो.
परंतु ह्या चित्रपटात इम्रानचं पात्र पूर्णपणे नेगेटिव्ह नाही आहे. कारण ह्या गैरमार्गाने मिळवलेल्या पैशाने तो गरीब आणि गरजू हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणातही आर्थिक मदत करतो.
परंतु एकदा तो अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडतो.
अश्या पद्धतीचे अनेक सिनेमे आपण पहिले असले तरी ह्या चित्रपटाचा विषय खूपच वेगळा आहे. इम्रान हाश्मीने खूप काळापासून हिट चित्रपट दिला नाही आहे आणि ह्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना पुन्हा एक हिट चित्रपट द्यायची संधी आहे.
२५ जानेवारीलाच मणिकर्णिका, सुपर ३०, ठाकरे ह्यांसारखे बहुचर्चित सिनेमे रिलीज होणार आहेत आणि हि नक्कीच इम्रानसाठी वाईट बातमी आहे.
ट्रेलर खाली पहा.
Related topics